मोठे उखाणे

हंड्यावर हंडे ठेवले सात, पाण्याला जाताना शिजत घातला भात, पाणी शेंदता-शेंदता तोल की गेला, काय सांगू तुम्हाला धनीन हात दिला, माहेरच्या आठवणीनं डोळं डबडबले, खरं सांगते तुम्हाला धनीन डोळे पुसलं, सुंदर कर्तृत्ववान धनीचा मला वाटतो अभिमान…… चं नाव घेते तुमचा मान राखून किंवा ………नी दिले मला सौभाग्याचं दान. सरसर जात होते, माडीवर पहात होते, खिडकी … Read more

नवरीने/पत्नीने नाव घेण्याचे उखाणे

कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन,…… च्या जिवावर आदर्श संसार करीन. आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण, …….चे नाव घेऊन बांधते कंकण. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,……. नाव घेते पत्नी या नात्याने. राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात्,…… नाव घेते नीट ठेवा लक्षात. महादेवाच्या पिंडीला वेल वाहते ताजा,…… नाव घेते पहिला नंबर माझा. कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास,……. … Read more