खास नवरदेवाने/पुरुषांनी घेण्याचे उखाणे

आजचा शुभदिन उद्याची कशाला बात, ——च्या बरोबर केली संसाराला सुरुवात.

चांदीच्या ताटामध्ये साखरभात, —-च्या हातामध्ये माझा हात.

क्वीन बाय क्वीन, डेक्कन क्वीन,——माझी लव्हली क्वीन.

लग्नासाठी मला आली आहे ग्रीटींग तार,
——चे नाव घेतो घाई आहे फार.

जॉनी मेरा नाम आहे हाऊसफुल्ल,—— आहे
सर्वात ब्युटीफूल.

सांगलीमध्ये आहे थिएटर स्वरूप,
——चे आहे लाखात एक रूप.

पिक्चरमध्ये पिक्चर जॉनी मेरा नाम,
—- चे नाव घेतो आता तुमचे काय काम.

शिनुमात शिनुमा बाई मी भोळी,
—- झाली आहे माझ्यापायी खुळी,

रंभा, मेनका स्वर्गतल्या अप्सरा,
—— चा पायगुण शकुनी खरा.
आकाशातून पडतात पावसाच्या सरी ——चं नाव घेतो—-घरी.

संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका —-नाव घेतो सर्वजण ऐका.

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस. —-चं नाव घ्यायला मला नाही आळस.

जाईजुईच्या फुलांचा सुटतो सुगंध – – – च्या सहवासात मला आहे आनंद.

नाव नाव नावांची काय बिशाद, मी आहे घरात, —-गेली ऑफिसात.

सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप, —-मला मिळाली आहे अनुरूप.

नंदनवनांत अमृताचे कलश, —-माझी आहे मोठी सालस.

क्रांतीच्या मंदिराचा ‘सावरकर’ कळस, —–चे नाव घेण्यात मुळीच नाही आळस.

भारताचा एक घोष लोकशाही समाजवाद,—– चे नाव घेतो पुरे करा वाद.

देवाच्या देवळात मखमली पडदा,—– नाव घेतो, बोला पुंडलीक वरदा.

चांदीची वाटी चांदीचे ताट, खुमखुमीत भांडण्यात आमची —- ताठ.

भाजीत भाजी मेथीची,—– माझ्या प्रीतीची.

वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती,
——चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती.

नंदनवनी कोकिळा बोलती गोड,—— राणी माझा तळहातावरचा फोड.

पाण्याच्या हंड्यावर, रुप्याचे झाकण,—– च्या हातात हिऱ्याचे कंकण.

जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला —– प्रेमपुतळी.

पुरुषाचे मन माझे उंच भराऱ्या घेते,—— त्याला प्रेमबंधन घालते.

देवळाला खरी शोभा कळसाने येते, —– मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

गव्हात गहू बन्सी, तांदुळात आंबेमोहोर,
—- चे नाव घेतो सांगितल्याबरोबर.

आंब्याचे पन्हे, उसाचा रस,—— चे नाव मनात रात्रंदिवस.

संसारातल्या संकटाची नाही पर्वा आता, साथ आहे माझ्या बरोबर—- कांता

श्रीकृष्णाने सांगितली अर्जुनाला गीता, संसारात भागीदार—-+ कांता.

जानकीच्या सहवासात रामाला वनवास गोड, —-च्या संसारात – – – – ची जोड.

दासांचा दासबोध अनुभवाचा साठा,—– चे नाव घेतो च्या करिता.

क्रियापदाशिवाय नाही वाक्याला पूर्ती,—- चे नाव हीच माझी स्फूर्ती.

रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, आमची —— त्यातच जमा.

आमच्या घरी आहे आज सत्यनारायणाची पूजा, —–माझी राणी, मी तिचा राजा.

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,—– मुळे झाले संसाराचे नंदनवन.

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,—— आहे माझे जीवन सर्वस्व.

विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात,—– अर्धांगिनी म्हणून घेतला हातात हात.

पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती, हाण नाही मार नाही,—— कशी रडती.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
—-आजपासून माझी गृहमंत्री.

फुलात फूल मदणबाण
—–माझा जीव की प्राण.

सायंकाळच्या आकाशाचा निळसर रंग,
—–माझी नेहमी घरकामात दंग.

काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
——–जीवनात मला आहे आनंद.

हिंदमातेच्या डोक्यावर मोत्याची जाळी,—— नाव घ्यायची माझ्यावर आली पाळी.

हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी,
—– च्या जीवनात मला आहे गोडी.

इंग्लिश भाषेला महत्त्व आले फार,
—–ने माझ्या संसाराला लावला हातभार.

वीज पुरवठ्यासाठी कोयनेला बांधले धरण,
—चे नाव घेतो आज आहे कारण.

खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड,
—–च्या रूपात नाही कुठेही तोड.

श्रावण महिन्यात असतात खूप सण,—– ला सुखात ठेवीन हा माझा पण.

निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,—– च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.

मायामय नगरी, प्रेममय संसार,—– च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

संसाराच्या सागरात पतीपत्नी नावाडी,—– ने लावली मला संसाराची गोडी.

मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,—- वर जडली माझी माया.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,—- बरोबर बांधली जीवनगाठ.

जगाला सुवास देत उमलते कळी,—- नाव घतो,—- वेळी.

आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,—- चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

चंद्र आहे रोहीणीचा सोबती,—– माझी जीवन साथी.

सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,—– नाव घ्यायला घाई घाई झाली.

सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण,—- आहे घरकामात दंग.

आंबेवनात कोकीळा गाते गोड,—– आहे माझ्या तळहाताचा फोड.

शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,—– राणी मिळाली स्वर्ग आला हाता.

सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,—- माझी राणी घरकामात गुंतली.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी,—- च्या जीवनात मला आहे गोडी.

इंद्राची इंद्राणी, दुष्यंताची शकुंतला,—- नांव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

धर्मेच अर्थच कामे च नातिचरामिं अशी शपथ घेतली,—– ही प्रिय पत्नी लाभल्याने धन्यता वाटली.

देवळाला खरी शोभा कळसाने येते.—- मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

कळी हसेल, फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध,—- च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

बोरकरांची कविता, जणू निसर्गाचे गाणे,—– ला देईन सुखाचे देणे.

बहरली फुलांनी निशिगंधाची पाती,—– –चे नांव घेतो लग्नाच्या राती.

गर्द आमराई, त्यामध्ये पोपटांचे थवे —-चे नांव, माझ्या ओठी यावे.

—-माझे पिता —– माझी माता शुभमुहूर्तावर घरी आणली, ही कान्ता.

अथांग फुलला गुलमोहोर हा प्रसन्न,—– च्या नावाचा बहर संपन्न.

मस्तकावरील फूल घेतले, दूधातुपात बुडविले,— च्या कपाळी, कुंकुमतिलक लावले.

जोडीने आंबा शिंपला, आता निघेल वरात,—-च्या साथीने, संसाराची सुरूवात.

घड्याळाचे काटे बघून धावपळ केली नऊ वाजले तशी,—— ऑफिसला गेली.

पाटावर बसून, ताटात तांदूळ पसरले त्यांवर सोन्याच्या अंगठीने,——- चे नांव लिहिले.

आंब्याच्या झाडावर, कोकीळा करी कूजन माझ्या नांवाचे,——- करी पूजन.

चित्रकाराने केली फलकावर रंगांची उधळण,——- चे नांव भासे जणू माणिकमोत्यांची उधळण.

उगवला रवी मावळली रजनी,—– चे नांव सदैव वसे माझ्या मनी.

जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुंगध,—— च्या सहवासात झालो मी धुंद.

वैदिक पद्धतीने घेतली संसाराची दीक्षा, जीवाच्या सुखदुःखात सहभागी

जीवनात मिळाला मनासारखा साथी माझ्या संसारारथावर,—- सारथी.

पुरुषाचे मन माझे उंच भराऱ्या घेते ,——त्याला प्रेमबंधन घालते.

जगाला सुवास देत उमळली कळी भाग्याने लाभली मला—— प्रेमपुतळी.

रसाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला,——च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.

काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,,—– जीवनात मला आहे आनंद.

संसाररुपी सागरात पती पत्नी नौका,—– नाव घेतो सर्वजण ऐका.

बशीत बशी कप बशी,—– सोडून बाकी सगळ्या म्हशी.

कमळाच्या फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात,—— नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात.

सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप,—— मला मिळाली आहे अनुरूप.

वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,—— आहे माझी सर्वात सुंदर.

श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,——– माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.

रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,—— च्या साथीने आदर्श संसार करीन.

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास,—– देतो मी— चा घास.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले,——- च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी कला,—- चा घास देतो माझ्या प्रिय—— ला.

—–माझे पिता—–माझी माता,
शुभ मुहुर्तावर आणली ,—— ही कांता.

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,—— ना घेऊन सोडतो कंकण.

इंद्राची इंद्रयणी दुष्यतांची शकुंतला,—— नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

देवळाला खरी शोभा कळसाने येते,—– मुळे माझे गृहसौख्य खुलते / दुणावते.

कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध,—— च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,—— च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,—– चं नाव घेतो—– च्या घरी.

जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र,—— च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.

उगवला रवी मावळली रजनी,—— चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

Leave a Comment