नवरीने/पत्नीने नाव घेण्याचे उखाणे

कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन,…… च्या जिवावर आदर्श संसार करीन.

आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण, …….चे नाव घेऊन बांधते कंकण.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,……. नाव घेते पत्नी या नात्याने.

राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात्,…… नाव घेते नीट ठेवा लक्षात.

महादेवाच्या पिंडीला वेल वाहते ताजा,…… नाव घेते पहिला नंबर माझा.

कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास,……. ना घालते लाडूचा घास.

सासरचे निरंजन माहेरची फुलवात,…… चे नाव घेण्यास करते सुरुवात.

राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात, —-चे नाव घेते—-च्या घरात.

रूपवतीला पहाव डोळे भरुन, गुणी माणसाचे घ्यावे गुण,——रावांचे नाव घेते—— मी सून.

ओ सागराला आली भरती, नदीला आला पूर,……. च्या सौख्याकरता आईबाप केले दूर.

माहेरच्या आठवणींची घेऊन शिदोरी आले मी सासरी,….. रावांची जन्मोजन्मी अशीच लाभू दे साथ संसारी.

सांजवेळेला पश्चिमा सजून धजून पाहते रवीची वाट,…..नाव घेते सोडा आता वाट. किंवा

सासरच्यानी माहेरच्यांनी मिळून केला लग्नाचा घाट,….नाव घेते सोडा आता वाट

चंदेरी रात्री धुंद करितो रातराणीचा सुगंध,
…. रावांच्या जीवनात फुलवीन सदा आनंद.

माया शोधावी तर मायलेकराची, भक्ती पहावी तर साधू-संतांची, त्याग लक्षात घ्यावा तर राम-लक्ष्मणाचा, सत्यव्रती म्हणून आदर्श पुढे ठेवावा तो राजा हरिश्चंद्रांचा,
……राव आपण आशीर्वाद मागावा तो वडीलधाऱ्या माणसांचा.

दान करणे हे हाताचे भूषण, सत्य बोलणे हे कंठाचे भूषण, ज्ञान ऐकणे हे कानाचे भूषण, – – – -रावांचे कर्तृत्व हेच माझे भूषण.

तोलू नयेत कधी विद्वान आणि राजा, त्याच्याच राज्यात होते राजाची पूजा, पण विद्वानाची होते सर्वत्र पूजा,—- रावांच्या सद्गुणांची मी करते मानसपूजा.

घुंगुरांचा घुमतो नाद गोठ्यात, मनीचे म्यावऽऽ म्याव स्वयंपाक घरात, पोपट करतो विठुऽऽ विठु सोप्यावर, पिंजऱ्यात भो ऽऽ भो करतो दारातला रखवाला,- — रावांच्या मुळे भोगते मी या वैभवाला.

तल्लीन व्हावे संत भजनी, मन लागावे देवपूजनी, ध्यान लागावे वडीलांच्या सेवनी, – —राव अन् मी हेच इच्छितो मनोमनी.

श्रावणात चालतो ऊन-पावसाचा खेळ, चे नाव घ्यायला लावत नाही वेळ.

एकच गुणी पुत्र असावा नको मूर्ख शंभर, एकच चंद्र नाहीसा करतो अंधार, नाही चांदण्यांची दाटी, —– रावांच नाव घेते——- साठी.

उंच आकाशी पक्षिणी करते विहार,——-रावांनी केली मला सौभाग्याची ठेव बहाल.

कार्तिकात येतो दीपावलीचा सण, चे नाव घ्यायला आग्रहाचे कारण.

फेब्रुवारीत गार पाण्यासाठी ठेवावा लागतो माठ, —- चालतात नेहमी भराभर आणि ताठ.

पारिजातकाचे फूल म्हणजे सात्त्विक सौंदर्याचे प्रतीक, ‘थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले – सारखे पती.

कुरुंदाची सहाण, चंदनाचे खोड,…. रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.

आधी घातला चंद्रहार, मग घातली ठुशी,…… रावांचे नाव घ्यायला माझी नेहमीच खुशी.

पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर,…… रावांच्या सेवेला —- नेहमीच हजर.

देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान,…… रावांचे नाव घेते, ऐका देऊन कान.

गौरीहार पुजले अन् बोहल्यावर चढले,…… रावांच्या सुखासाठी संसारात गढले.

पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा,….. रावांच्या नावाने भरला हातात चुडा.

कार्तिकात येतो दीपावलीचा सण, ……चे नाव घ्यायला आग्रहाचे कारण.

फेब्रुवारीत गार पाण्यासाठी ठेवावा लागतो माठ, ……चालतात नेहमी भराभर आणि ताठ.

पारिजातकाचे फूल म्हणजे सात्त्विक सौंदर्याचे प्रतीक, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले ….. सारखे पती.

गाईच्या शिंगांना लावला सोनेरी रंग,…. राव बसले कामाला की होतात त्यात दंग.

आईनं वोढवलं, वडिलांनी पढवलं,….. रावांनी त्यांची होताच सोन्यानं मढवलं.

मोंत्यांचे पेले पाहून चंद्रसूर्य हासे, जमलेल्या मंडळीत —- राव खासे.

मावळला सूर्य उगवला शशी,…. रावांचे नांव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.

जीवनाच्या कोंदणात फुलले प्रीतीचे पुष्प,….. रावांच्या नावाने घेते मी सौभाग्याचा गुच्छ

निसर्गावर करू पहात आहे आजचा मानव मात अर्धांगी म्हणून दिला, …… रावांच्या हाती हात.

जीवनाच्या सागरावर सप्तरंगी फूल विचारांचा,…. रावांसह सुखी होईल प्रवास संगीत संसाराचा.

चंद्राला येतो उदय, समुद्राला येते भरती,….. रावांच्या शब्दाने सारे श्रम हरती.

नीलवर्ण आकाशात चमकतात चांदण्या,……. रावांचे नांव घेते ची कन्या.

आंब्याच्या झाडाला आंबे लागले शंभर रावांचे,…… नांव घेते माझा पहिला नंबर.

सोन्याची घागर अमृताने भरावी,….. रावांची सेवा जन्मभर करावी.

गंगावाहे यमुनावाहे सरस्वती झाली गुप्त,…… रावांच्या पदरी घालून आईबाप झाले मुक्त.

तुकारामाने केले अभंग मोरोपंतांनी केली आर्या,…. रावांची कन्या व रावांची,……. भार्या

शिवाजी राजाची जिजाई होती माता,….. रावांचे नांव घेऊन येते मी आता.

व्यंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार,….. रावांना घालते पुष्प हार.

चातक पक्षी पावसाचे पितो पाणी,…… रावांची झाले मी राणी.

चांदण्या रात्री रातराणीचा सुवास,……. रावांचे नांव घेत तुमच्या साठी खास.

श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंती माला,…… रावांचे घेते मंगल दिन आला.

आरक्त गालावर उमटले लज्जेचे भाव,….. रावांने घेतला माझ्या अंतःकरणाचा ठाव.

सकाळच्या वेळी बागेत फुल तोडतोय माळी,……. रावांचे नांव घेते आता तुमच्यावर आली पाळी.

यमुनेच्या तिरावर ताजमहालची इमारत,….. रावांचे नांव घेण्यास नाही मी हरत.

हिरवा शालू नेसून आले,…… रावांच्या जीवनांत समरस झाले.

शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा,….. रावांच्या संसारांत माझा आहे अर्धा वाटा.

आदघर मजघर, मजघरांत पलंग, पलंगावर उशी,….. रावांच्या जीवावर मी आहे खुषी.

शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज,…… रावांचे नांव घेते गौर बसली आज.

Leave a Comment